अमरप्रीत चौकात भुयारी मार्ग अन् विमानतळासमोर उड्डाणपूल
जालना रोडची कोंडी फुटणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शेंद्रा ते वाळूजदरम्यान १८ किलोमीटर लांबीचा अखंड उड्डाणपूल व उन्नत रस्ता उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी (दि. २६) नगर नाका येथे या नियोजित भव्य प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा विस्तृत आढावा घेतला.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ४,१५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
क्रांती चौकाचे सुशोभीकरण
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवून परिसराचे आकर्षण वाढवले जाईल व सुशोभीकरण केले जाईल. या पाहणी आणि आढावा बैठकीप्रसंगी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार
नियोजित अखंड उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. विलास भुमरे आदी उपस्थित होते.
संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्यासह प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य
या प्रकल्पअंतर्गत अमरप्रीत चौकात भुयारी मार्ग (अंडरपास), तर चिकलठाणा
विमानतळासमोर नवीन उड्डाणपूल उभारण्यात येईल. दुसरा मजला उड्डाणपूल महावीर चौकात सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या वरून हा नवीन अखंड उड्डाणपूल जाणार आहे. वाहनधारकांना शहरात सहज प्रवेश करता यावा आणि रहदारी सुरळीत राहावी, यासाठी या उड्डाणपुलाला शहरात विविध ठिकाणी उतरण्यासाठी 'रॅम्प' (उतार) दिले जातील.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













